गणेश त्र्यंबक देशपांडे

डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे (ऑगस्ट १४, १९१० - १९८९) हे मराठी व संस्कृत लेखक होते. याचबरोबर ते साहित्यशास्त्र आणि व्याकरणातील जाणकारही होते.[1]

गणेश त्र्यंबक देशपांडे

अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील वडनेरगगाई येथे ऑगस्ट १४, १९१० रोजी डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म झाला. नागपूर विद्यापीठातील संस्कृत विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित साहित्य

  • भारतीय साहित्यशास्त्र
  • इंडॉलॉजिकल पेपर्स (विदर्भ संशोधन मंडळ १९७१)
  • अभिनवगुप्त (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८९)

पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. "डॉ. ग. त्र्यं. देशपांडे जन्मशताब्दी; शुक्रवारपासून व्याख्यानमाला" (मराठी मजकूर). लोकसत्ता. १३ ऑगस्ट २००९. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे



This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.