अलोंग
अलाँग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पश्चिम सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलाँग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
हवामान
अलाँग शहरातील हवामान वर्षभर संमिश्र स्वरुपाचे असते. हिवाळ्यात येथील तापमान ० डिग्री सेल्सीअसच्या जवळपास असते. तर उन्हाळ्यात जवळपास ३२ डिग्री पर्यंत जाते. या शहरात पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतो. वर्षभरात जवळपास २४७६ मिलीमीटर पाऊस येथे पडतो.
This article is issued from
Wikipedia.
The text is licensed under Creative
Commons - Attribution - Sharealike.
Additional terms may apply for the media files.