जोधपूर

जोधपूर (राजस्थानी: जोधाणा, हिंदी भाषा: जोधपुर) भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर जोधपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व गोल्डन सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात भारतीय वायूसेनेचा एक मुख्य विमानतळ म्हणून महत्त्वाचे ठिकाण आहे.


शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

मेहरानगढचा किल्ला
  • मेहरानगढचा किल्ला - शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असूनहा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसतो. अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहेत. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
  • जसवंत थडा
जसवंत थडा
  • मंढोरची मंदिरे-येथील सूर्यमंदिराची भारतातील काही मोजक्या सूर्यमंदिरांत याची गणना होते. या मंदिरातील घुमटाची नक्षी अतिशय वेधक आहे. तसेच दुर्मिळ ब्रम्हदेवाचेही मंदिर येथे आहे.
  • उम्मेद भवन - नवीन राजवाडा असून याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुनी भारतीय तसेच पाश्चात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाड्यात आहे. आज हा राजवाडा सप्ततारांकित हॉटेल म्हणून वापरला जातो.
उमेध भवन

हे सुद्धा पहा

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.