दयानंद महाराज (शेलगाव)

दयानंद महाराज यांचा जन्म शेलगाव या गावी झाला. शेलगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातले एक तीर्थक्षेत्र आहे. योगिराज दयानंद महाराज हे एक अत्यंत कठोर नाथपंथीय तपस्वी असून नवनाथांची शाबरी विद्या कलियुगामध्ये चालवणारे महाराज आहेत. महाराजांनी आतापर्यंत कित्येक लोकांच्या व्याधी, उपाधी, सांसारिक दु:खे दूर केली आहेत, अशी त्यांची ख्याती आहे. नवनाथांचेच कार्य होत असलेल्या शेलगाव या तपोभूमीला भेट देणाऱ्यास याची प्रचिती येते असे म्हणतात. योगिराज दयानंदबाबांमुळे शेलगावाला भाविकांचा वाढता महापूर आणि नवनाथांचे कार्य यामुळे शेलगावाला तीर्थक्षेत्राची मान्यता प्राप्त झाली. बाबांनी आतापर्यंत सहा यज्ञ केले आहे. त्यातील राजसूय यज्ञ हा अत्यंत मोठा यज्ञ महाराजांनी केला. या यज्ञामध्ये ११,००,००० लोकांचे अन्नदान होऊन अखंड २१ दिवस यज्ञाहुती चालल्या होत्या. या यज्ञामध्ये त्यांची श्रीकृष्णासारखी तुळशीपत्रांनी तुला वजन करण्यात आली. हे सर्व काशी येथील जगत्गुरू शंकराचार्य यांनी बघितले व सांगितले की ’हे सामान्य संत नाहीत’. 'जगत्गुरू शंकराचार्य यांनी दयानंद बाबांना "योगिराज" ही उपाधी प्रदान केली.

योगिराज दयानंद महाराज यांनी पुढे त्यांनी काशी, हरिद्वार, माहूर गड या ठिकाणी अत्यंत मोठे यज्ञ पार पाडले. त्यांचे हे कार्य बघून इ.स. २०१३ या सालातील कुंभमेळ्यामध्ये त्यांना ”धर्माचार्य श्रीश्री १००८ महामंडलेश्वर” अशी उपाधी देण्यात आली. नवनाथाचे हे अवतारकार्य होत असलेल्या तपोभूमीला भेट देण्यासाठी, भाविक महाराष्ट्रातील औरंगाबादपासून ६० कि.मी.वर असलेल्या शेलगावाला भेट देतात.

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.