डेहराडून

डेहराडून ही भारताच्या उत्तराखंड राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डेहराडून शहर उत्तराखंडच्या पश्चिम भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डून खोऱ्यामध्ये वसले आहे. गंगा नदी डेहराडूनच्या पूर्वेकडून तर यमुना नदी पश्चिमेकडून वाहते. डेहराडून भारताची राजधानी दिल्लीच्या २३६ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली डेहराडूनची लोकसंख्या सुमारे ५.७८ लाख होती. आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डेहराडूनमध्ये अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. नैनिताल, मसूरी इत्यादी पर्यटनस्थळे तसेच हरिद्वार, ऋषिकेश इत्यादी धार्मिक स्थाने येथून जवळच असल्यामुळे डेहराडून एक गजबजलेले शहर आहे.

डेहराडून
भारतामधील शहर

घंटा घर
डेहराडून
डेहराडूनचे उत्तराखंडमधील स्थान
डेहराडून
डेहराडूनचे भारतमधील स्थान

गुणक: 30°19′0″N 78°1′44″E

देश  भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा डेहराडून जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,४२७ फूट (४३५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,७८,४२०
  - महानगर ७,१४,२२३
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

वाहतूक

जॉली ग्रँट विमानतळ डेहराडूनच्या २२ किमी आग्नेयेस स्थित असून येथे एअर इंडिया, जेट एअरवेजस्पाइसजेट ह्या कंपन्या मुंबई, दिल्ली, बंगळूर इत्यादी शहरांहून थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात.

डेहराडून रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग ७२राष्ट्रीय महामार्ग ७२ ए डेहराडूनमधूनच जातात.

हेही पहा

बाह्य दुवे

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.