नारायण राणे

नारायण राणे (एप्रिल १०, इ.स. १९५२ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेले. त्यांचे पुत्र निलेश नारायण राणेनितेश नारायण राणे हेदेखील राजकारणी आहेत.१ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली.

नारायण राणे


कार्यकाळ
१ फेब्रुवारी, इ.स. १९९९  १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९
मागील मनोहर जोशी
पुढील विलासराव देशमुख

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री
कार्यकाळ
२० फेब्रुवारी, इ.स. २००९  ऑक्टोबर २०१४
मागील अशोक चव्हाण

जन्म २० एप्रिल, १९५२ (1952-04-20)
राजकीय पक्ष शिवसेना
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी नीलम राणे
अपत्ये निलेश नारायण राणे
नितेश नारायण राणे

राजकीय कारकीर्द

नारायण राणे हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून ते २००९ साली बहुमताधिक्याने निवडून आले, मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

संक्षिप्त कारकीर्द

  • इ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
  • इ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
  • इ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
  • इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
  • इ.स. २००८ : प्रहार (वृत्तपत्र) सुरू केले.
  • इ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागितल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली.
  • इ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
  • इ.स. २०१४ : विधानसभा निवडणुकीत पराभव
  • इ.स.२०१७ : 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना.

नारायण राणे यांचे आत्मचरित्र

  • नो होल्ड्स बार्ड (मराठीत 'झंझावात')

{{ |यादी=महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |पासून=फेब्रुवारी १, इ.स. १९९९ |पर्यंत=ऑक्टोबर १७, इ.स. १९९९ |मागील=मनोहर जोशी |पुढील=विलासराव देशमुख }}



This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.