बस्तर जिल्हा

बस्तर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जगदलपुर येथे आहे.

हा जिल्हा छत्तीसगढचा दक्षिण भाग आहे. यास 'दक्षिण छत्तीसगढ' असेही म्हणतात.या जिल्ह्यातील 'बस्तरचा दसरा' अतिशय प्रसिद्ध आहे.येथील वस्ती आदिवासीबहुल आहे. ते पारंपारिक पद्धतीने शेती करतात. तेथे वाहन म्हणून बैलगाडीचा वापर आहे. ट्रॅक्टर वगैरे वाहने अपवादानेच आढळतात.येथे १० ते १२ प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत. अर्वांचे वेगवेगळे वैविध्य आहे. अगदी भाषेपासून ते सर्व चालीरितीपर्यंत. ज्या ठिकाणावरुन या जिल्ह्याचे 'बस्तर' हे नाव पडले ते बस्तर गाव रायपूर-जगदलपूरला रस्त्याने जातांना २५ किमी आधी पडते.[1]

बस्तर या गावात व शेजारी आदिवासी नृत्यकला, शिल्पकला, काष्ठ कला बांबू आर्ट मेटलक्राफ्ट वगैरे गोष्टी बघावयास मिळतात.या ठिकाणच्या बहुसंख्य लोकांचे आराध्य दैवत दंतेश्वरी देवी आहे.या देवीचे मंदिर दंतेवाडा येथे आहे.[2]


चतुःसीमा

तालुके

संदर्भ व नोंदी

  1. तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- बस्तर". नरकेसरी प्रकाशन नागपूर. ३०/१०/२०१६. ०६/११/२०१६ रोजी पाहिले.
  2. तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- बस्तर". नरकेसरी प्रकाशन नागपूर. ३०/१०/२०१६. ०६/११/२०१६ रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.