कोकण विभाग
कोकण विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
कोकण विभाग कोंकण | |
महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग | |
![]() कोकण विभागचे भारत देशामधील स्थान | |
देश | ![]() |
स्थापना | १ मे १९६० |
मुख्यालय | मुंबई |
राजकीय भाषा | मराठी |
क्षेत्रफळ | ३०,७४६ चौ. किमी (११,८७१ चौ. मैल) |
लोकसंख्या | 24,807,357 |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
कोकणातील पारंपारिक घरे
इतिहास
ब्रिटीश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटीश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी असे तीनच जिल्हे होते.
चतुःसीमा
कोकण विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र), उत्तरेस गुजरात राज्य व दक्षिणेस गोवा राज्य आहे.
थोडक्यात माहिती
- क्षेत्रफळ - ३०,७४६ किमी²
- लोकसंख्या (2011ची गणना) - 2,87,39,397
- जिल्हे - मुंबई जिल्हा, मुंबई उपनगरी जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा
- साक्षरता - ८१.३६%
- ओलिताखालील जमीन : ३,४८४ चौरस किमी
This article is issued from
Wikipedia.
The text is licensed under Creative
Commons - Attribution - Sharealike.
Additional terms may apply for the media files.